६ . अजून जिवंत आहे आमच्या ढाक्क्याची मलमल
६ . अजून जिवंत आहे आमच्या ढाक्क्याची मलमल
हि कविता कोणाला ?
बराक ओबामा तुला
कि मेंचेस्टार मेंचेस्टार म्हणून नाचणाऱ्या
खेळ, कपडे, आवडीचा क्लब सगळेच मेंचेस्टर
असलेल्या माझ्या भारतीय मुला, तुला
काहीच कळत नाहीये !
आज सांगायचीच त्याला कथा
ब्रिटीश अत्याचाराची ठसठसती व्यथा
दोनशे वर्षांपूर्वीपासून काळजात लपलेली
योग्य वेळी सांगेन म्हणून निगुतीने जपलेली
मेंचेस्टरने केलेल्या ढाक्यावरील अत्याचाराची
नखावरील चिरीसाठी बलिदानलेल्या अंगठ्याची
पित्याला आलेली भेटसाडी झेबुन्निसा नेसली
आणि समोरच्या दर्पणात बघून खुदकन हसली
इन्शाल्ला, या वस्त्राने माझे सौदर्य आवृत्त ?
कि तरलत्या तरलतेत परावर्त अनावृत्त ?
टपकत्या लज्जाश्रूंनी ती अधिकच थिजली
आवरती लज्जापाने अधिकच भिजली
मिशेलला नेमके काय सांगायचे ?
झेबुन्निसाची लाज कि मेंचेस्टरचा माज ?
कि प्राण देऊनही जपलेला कलावंती राज ?
युरोपियनानो …. .
काळाआड गेली तुमची कलाद्वेषी मळमळ
अजून जिवंत आहे आमच्या ढाक्क्याची मलमल
हि कविता कोणाला ?
बराक ओबामा तुला
कि मेंचेस्टार मेंचेस्टार म्हणून नाचणाऱ्या
खेळ, कपडे, आवडीचा क्लब सगळेच मेंचेस्टर
असलेल्या माझ्या भारतीय मुला, तुला
काहीच कळत नाहीये !
आज सांगायचीच त्याला कथा
ब्रिटीश अत्याचाराची ठसठसती व्यथा
दोनशे वर्षांपूर्वीपासून काळजात लपलेली
योग्य वेळी सांगेन म्हणून निगुतीने जपलेली
मेंचेस्टरने केलेल्या ढाक्यावरील अत्याचाराची
नखावरील चिरीसाठी बलिदानलेल्या अंगठ्याची
पित्याला आलेली भेटसाडी झेबुन्निसा नेसली
आणि समोरच्या दर्पणात बघून खुदकन हसली
इन्शाल्ला, या वस्त्राने माझे सौदर्य आवृत्त ?
कि तरलत्या तरलतेत परावर्त अनावृत्त ?
टपकत्या लज्जाश्रूंनी ती अधिकच थिजली
आवरती लज्जापाने अधिकच भिजली
मिशेलला नेमके काय सांगायचे ?
झेबुन्निसाची लाज कि मेंचेस्टरचा माज ?
कि प्राण देऊनही जपलेला कलावंती राज ?
युरोपियनानो …. .
काळाआड गेली तुमची कलाद्वेषी मळमळ
अजून जिवंत आहे आमच्या ढाक्क्याची मलमल
Comments
Post a Comment