४ . चिन्ह
४ . चिन्ह
प्रसिद्ध डॉक्टरची प्रसिद्ध बंगली
आणि त्या बंगलीतील प्रसिद्ध दवाखाना
रस्त्यांच्या तिस्कवर कोपऱ्यात वसलेला
अगदी पहाटे पहाटे पहिला माणूस
उजाडता ही भली थोरली रांग
साग्रसंगीत
तपासणी, अनुमान, औषध, शुल्क
त्याच रस्त्याचा तोच कोपरा
आणि कोपऱ्यातील तो वीज खांब
खांबाच्या आधाराने साडी सुकतेय
काळोख असताना तिने आंघोळ केलीय
गजबजणार असलेल्या रस्त्याशेजारी
मूकपणे सांगतेय
टाइल सभोवतालची ओल
संन्याशाच्या बाबतीत माहित होते
करतल भिक्षा तरुतल वास
इथे साक्षात गृहलक्ष्मी रस्त्यावर
करतल भिक्षा नभतल वास
थोडीशी वेडसर असेल कदाचित
पण माणूसच
ईश्वराचा तोच अंश स्वतात घेऊन वावरणारी
डोळस असतो माणसांना तपासणारा
डोळस नसतो तपासून घेणारा
डोळस होतो उपचार घेतलेला
डोळस करणारा व डोळस होणारा
तिथेच वावरताहेत
त्याच डोळस कोपऱ्यात व्यवहार करताहेत
कोणालाच दिसत नाही
कोणी दाखवत नाही
ती आहे
आई !
समाजपुरुषाचे डोळे तपासायचे चिन्ह
परमेश्वराने माणूसप्राण्यांना डोळस करायला
लावलेले जिवंत डोळस चिन्ह
दै . नवप्रभा
प्रसिद्ध डॉक्टरची प्रसिद्ध बंगली
आणि त्या बंगलीतील प्रसिद्ध दवाखाना
रस्त्यांच्या तिस्कवर कोपऱ्यात वसलेला
अगदी पहाटे पहाटे पहिला माणूस
उजाडता ही भली थोरली रांग
साग्रसंगीत
तपासणी, अनुमान, औषध, शुल्क
त्याच रस्त्याचा तोच कोपरा
आणि कोपऱ्यातील तो वीज खांब
खांबाच्या आधाराने साडी सुकतेय
काळोख असताना तिने आंघोळ केलीय
गजबजणार असलेल्या रस्त्याशेजारी
मूकपणे सांगतेय
टाइल सभोवतालची ओल
संन्याशाच्या बाबतीत माहित होते
करतल भिक्षा तरुतल वास
इथे साक्षात गृहलक्ष्मी रस्त्यावर
करतल भिक्षा नभतल वास
थोडीशी वेडसर असेल कदाचित
पण माणूसच
ईश्वराचा तोच अंश स्वतात घेऊन वावरणारी
डोळस असतो माणसांना तपासणारा
डोळस नसतो तपासून घेणारा
डोळस होतो उपचार घेतलेला
डोळस करणारा व डोळस होणारा
तिथेच वावरताहेत
त्याच डोळस कोपऱ्यात व्यवहार करताहेत
कोणालाच दिसत नाही
कोणी दाखवत नाही
ती आहे
आई !
समाजपुरुषाचे डोळे तपासायचे चिन्ह
परमेश्वराने माणूसप्राण्यांना डोळस करायला
लावलेले जिवंत डोळस चिन्ह
दै . नवप्रभा
Comments
Post a Comment