Posts

७. आई तुझ्याचसाठी हे विश्व जिंकू सारे

७. आई तुझ्याचसाठी हे विश्व जिंकू सारे  आई तुझ्याचसाठी हे विश्व जिंकू सारे  भारुनि आज टाकू नभ चंद्र सूर्य तारे  जन्म मज दिला सोसले अमाप त्रास  काऊ चिऊ दावुनी भरविला तोंडचा घास  भावंडांची काढलेली सहन केली खोडी  लोभस बाल्य जीवनाची लावियली तू गोडी  अक्षर गिरवुनी घेता तू शिकवलीस भाषा  चैतन्यमयी जीवनाची दावियलीस आशा  नाविन्याच्या उत्साहाला संयमाची साथ  विकसणाऱ्या क्षितिजाचा मी पकडावा हात  अनंत आशा काही निराशा असा संसारझुला  घसरता तोल सावरणे जीवन साधना मुला  वृक्ष हो आधारवड हो नको बनू हस्तक  बघायचंय जग तोलणारे शेषनागाचे मस्तक 

६ . अजून जिवंत आहे आमच्या ढाक्क्याची मलमल

६ . अजून जिवंत आहे आमच्या ढाक्क्याची मलमल हि कविता कोणाला ?    बराक ओबामा तुला  कि  मेंचेस्टार  मेंचेस्टार म्हणून नाचणाऱ्या  खेळ, कपडे, आवडीचा क्लब सगळेच  मेंचेस्टर असलेल्या माझ्या भारतीय  मुला, तुला  काहीच कळत नाहीये ! आज सांगायचीच त्याला कथा    ब्रिटीश अत्याचाराची ठसठसती व्यथा  दोनशे वर्षांपूर्वीपासून काळजात लपलेली  योग्य वेळी सांगेन म्हणून निगुतीने जपलेली मेंचेस्टरने केलेल्या ढाक्यावरील अत्याचाराची  नखावरील चिरीसाठी बलिदानलेल्या अंगठ्याची  पित्याला आलेली भेटसाडी  झेबुन्निसा नेसली  आणि समोरच्या दर्पणात बघून खुदकन हसली  इन्शाल्ला, या वस्त्राने माझे सौदर्य आवृत्त ? कि तरलत्या तरलतेत परावर्त अनावृत्त ? टपकत्या लज्जाश्रूंनी ती अधिकच थिजली  आवरती लज्जापाने अधिकच भिजली  मिशेलला नेमके काय सांगायचे ? झेबुन्निसाची लाज कि  मेंचेस्टरचा माज ? कि प्राण देऊनही जपलेला कलावंती राज ? युरोपियनानो …. .  क...

५ . शून्याचा शोध तुझ्याच पूर्वजांनी लावला होता .

विषय - सामाजिक शीर्षक - शून्याचा शोध तुझ्याच पूर्वजांनी लावला होता . साठ वर्षे अशीच निघाली इंग्रजांचे गोडवे गात ज्यांनी आम्हाला पत्ता दिली राजविलासी मत्ता दिली लायकी नसताना नालायकी झाकीत, दत्त म्हणत सत्ता दिली कृतज्ञतेचे अनावर झालेले अश्रू मिरवीत मिरवीत त्यांचे सुकलेले किंचित डाग कुरवाळीत कुरवाळीत पाच तपे संपली, हि कृतज्ञता कि कृतघ्नता  ? सतत नकारघंटेचा घोष अपयश नेणीवा उणीवा सकारात्मकतेचा शब्द नाही ' इंडिया इज पुअर कंट्री '  कोणी पढवलं ? आ नो भद्रा ' म्हणत हिमालयाकडे बोट दाखवायला कोणी तुम्हाला अडवलं ? मास्तरण्यांनो , भोपळ्या म्हणतांना हातावर काठी मारताना कधीतरी हेही सांगा भोपळ्या , शून्याचा शोध केवळ आणि केवळ केवळ आणि केवळ तुझ्याच पूर्वजांनी लावला होता . कवी - कौतुक काशिनाथ बाळे पत्ता - आशियाना, कोंब, मडगांव, गोवा . ४०३६०१ भ्रमण -  ९८५०४५३८७६ पाठवणी - पवन गवई,  ९६०४०५२९७३ लॉकडावन  समूह महाराष्ट्र , आदिभाऊंच्या वाढदिवसानिमित्त, दि. २३-४-२०२०   शीर्षक - शून्याचा शोध तुझ्याच पूर्वजांनी लावला होता...

२. भारतमाते म्हान देवते, जागय तुजी सासाय

          २. भारतमाते म्हान देवते भारतमाते म्हान देवते, जागय तुजी सासाय  आमका स्वदेशी जाय ।।धृ ०।। शक मुघलांनी डच आंग्लांनी, लुटली आमची मांय  तरांतरांनी विद्रूप केली, भांगराभुयचि काय  परथुन एकदा परमवैभवा, ह्या देशाक तू पाय ।।१।। गांधी गेनू सुटके झुजारी, खादी चरखो चलय  विनायका तू लकडी पुलाचेर, कपड्या होळी खेळय  बाल केशवा मोखून मार गा, व्हिक्टोरियाची मिठाय ।।२।। भायल्यो वस्तू रंगीत संगीत, आसल्यो जरी सवाय   सगळे करता दाय जाल्यार रे, आवय कित्याक ती जाय  भारतीयांच्या चिंतनाक येव दी, देशभक्तीची साय ।।३।।

३ . पावलां पावलां एक पडू दी

३ . पावलां पावलां एक पडू दी  पावलां पावलां एक पडू दी  हि तना मना धना जुळू दी ।।धृ ०।। देशभक्ती गीत  तुजे मातृभक्ती गीत  ताल सूर समा मिळू दी ।।१।। पंथ भेस भास  हाका एकचाराचो पास  रंग धवो इन्द्रधनु दी ।।२।। संस्कृताये पांख  हाका रंग लाख लाख  गुढी गावा गावा खेळू दी ।।३।।                                         दायज, त्रैमासिक -  ऑगस्ट २०१४

४ . चिन्ह

                   ४ . चिन्ह  प्रसिद्ध डॉक्टरची  प्रसिद्ध बंगली आणि त्या बंगलीतील प्रसिद्ध दवाखाना   रस्त्यांच्या तिस्कवर कोपऱ्यात वसलेला  अगदी पहाटे पहाटे पहिला माणूस  उजाडता ही भली थोरली रांग  साग्रसंगीत  तपासणी, अनुमान, औषध, शुल्क  त्याच रस्त्याचा तोच कोपरा  आणि कोपऱ्यातील तो वीज खांब  खांबाच्या आधाराने साडी सुकतेय  काळोख असताना तिने आंघोळ केलीय  गजबजणार असलेल्या रस्त्याशेजारी  मूकपणे सांगतेय  टाइल सभोवतालची ओल  संन्याशाच्या बाबतीत माहित होते  करतल भिक्षा तरुतल वास  इथे साक्षात गृहलक्ष्मी रस्त्यावर  करतल भिक्षा नभतल वास थोडीशी वेडसर असेल कदाचित  पण माणूसच  ईश्वराचा तोच अंश स्वतात घेऊन वावरणारी  डोळस असतो माणसांना तपासणारा  डोळस नसतो तपासून घेणारा  डोळस होतो उपचार घेतलेला  डोळस करणारा व डोळस होणारा  तिथेच वावरताहेत  त्याच डोळस कोपऱ्यात व्यवहार करताहेत  कोणालाच...

१. एकटा

                    १. एकटा  रस्ता माणसांनी ओसंडून वाहतोय  माणसांची लगबग, वाहनांची धडधड  जो तो आपल्याच नादात, तालांत  मी मात्र बाजूला एकटा  असे म्हणतात येताना  देवाने दिलेले काम करून जाताना  आणि मधल्या साऱ्या धडपडीत  माणूस जीव बिचारा एकटा  मुलाचा जन्मसोहळा, बारसे  नावाचे कुतूहल डोळ्यांत दाटतेय  जिभेवर साखर, हातात पेढा घेत  जण एक परततोय, बाळ तिथे एकटा  शाळा, कोलेज नवी पुस्तके नवे मित्र  उत्सव, समारंभ, पिकनिक्स, फनविक्स  टाळ्यांची बरसात, बक्षिसांची खैरात  परीक्षा देताना मात्र एकटा  त्याची नजर, तिची नजर  ठिणगी पडते, ज्योत पेटते  आणाभाका, प्रेमविवाह, मधुचंद्र  सुखाच्या बहरानंतर हा एकटा  कर्तृत्वशिखरे, गौरव स्तुतीगाने  हास्यफवारे, टाळ्यांचे गडगडाटणे  गात्रांची थकावट, म्हातारपणाची आहट  जग आपल्या जागी, तो एकटा  पापण्यांची फडफड हृदयाची धडधड स्तब्ध  सांगातीच्या रडारडीत ' राम नाम सत्य है...